परंडा,ता.१५ नगरपालिका कंञाटी सफाई कामगार,पाणीपुरवठा विभाग,इलेक्ट्रिशियन कर्मचाऱ्यांचे मागील आठ महिन्यापासुनचे पगार थकीत न दिल्याने गुरुवार ता.१५ आॕगस्ट रोजी सकाळी ध्वजवंदन झाल्यानंतर नगरपालिका आवारात अंदोलन करीत सफाई कामगार व महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न झाला.यावेळी कांही सफाई कामगार हातात पेट्रोल बाटल घेऊन पालिका इमारतीवर चढले.यावेळी मोठी गोंधाळाची परिस्थिती निर्माण झाली होती.पोलींसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.”पालिका ठेकेदाराचा,मुख्याधिकारी यांचा धिक्कार असो,कामगारांचे थकीत बील मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी अंदोलकांनी परिसर दणाणुन गेला होता.याबाबत माहिती अशी की,पालीका प्रशासनाकडे ठेकेदारामार्फत एकुण ४५ पुरुष व सफाई महिला कामगारांची कंञाटी नियुक्ती आहे.या कर्मचाऱ्यांना मागील नऊ महिन्यापासुन पालिका ठेकेदाराने वेतन दिलेच नाही.त्यामुळे सर्व कंञाटी कर्मचाऱ्यांच्या कुंटुबासह उपासमार होत असुन मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सफाई कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.पालिका मुख्याधिकारी मनिषा वडीपल्ले यांच्याकडे वेळोवेळी वेतन मिळण्यासाठी विनंती केली,निवेदने दिली.माञ,संबधित ठेकेदारांने सफाई कामगारांचे वेतन दिले नाही.आठ दिवसापुर्वी १५ आॕगस्ट स्वातंञ्यदिनी अंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.अखेर पालिका कंञाटी सफाई कामगारासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी अंदोलन करीत आत्मदहनाचा पविञा घेतला.यावेळी शिवसेना (उबाठा)जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील व सत्तार पठाण यांनी कञांटी कामगारांचे नेतृत्व करीत प्रशासनाकडे बाजु मांडण्याची भुमिका घेतली होती.यावेळी मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांना घेराव घालुन वेतनाबाबत जाब विचारला जात होता.यावेळी महिला सफाई कामगार महिला आक्रमक झाल्या आहेत.अंदोलकामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.पालिका आवारात सफाई कामगारांचे ठिय्या अंदोलन सुरु होते.यावेळी मोठी गर्दी झाली होती.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.