देवगांव (बु ) प्रतिनिधी दि. 22 परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे परंडा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या सूचनेनुसार ग्रामसेवक विलास मिस्कीन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत खंडेश्वरवाडी यांच्या 10 टक्के उपकर निधीतून सरपंच सौ.अशा राऊत यांनी अंगणवाडी क्र.720 आणि 721 मधील 39 बालकांना थंडी पासून लहान बालकांचे स्वसंरक्षण व्हावे या हेतूने गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांच्या आदेशानुसार आज दि. 22 मंगळवार रोजी स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.अशा राऊत, ग्रामसेवक विलास मिस्कीन,ग्रामपंचायत सदस्य बालाजी नलवडे, सोमनाथ जाधव, रमेश काळे, नवनाथ लष्कर,विक्रम बोबलट, (रो. से ) मधुकर बोबलट (शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष ) रामा भांडवलकर,अंगणवाडी मधील अंगणवाडी ताई व मदतनीस,प्रल्हाद जाधव ग्रा. कर्मचारी व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.