परंडा तालुक्यातील जेकटेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकावरच असून सध्या काही ठिकाणी ज्वारीचे पीक समाधानकारक अवस्थेत दिसत आहे. परंतु असे असले तरी देखील बहुतांश ठिकाणी त्यावर चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जनावरांना चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्यावर परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. उत्पन्नात देखील घट होण्याची भीती चिंचपूर (बु ),पांढरेवाडी,ताकमोडवाडी, खंडेश्वर वाडी ,आदी भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा पिके चांगली दिसत असली तरीदेखील शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेवटी शेवटी निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामात बाजरीचे काही प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात ज्वारी या पिकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत शिवाय ग्रामीण भागातील कोरडवाहू शेती करणारे शेतकरीही याच पिकाकडे डोळे लावून बसले होते. सुरुवातीलाच जमिनीत ओल नसल्यामुळे ज्वारीच्या पेरण्या काहीशा उशिराने झाल्या. मध्यंतरी बदलत्या वातावरणात पिके बऱ्यापैकी फुलली. आता बहुतांश ठिकाणी ज्वारीचे पीक हे हुरडा अवस्थेत आले आहे. तर मध्य फेब्रुवारीत काढणीला सुरुवात होईल असे दिसते. मागील महिन्यात पडलेल्या आवकाळी पावसामुळे आणि गेले तीन ते चार दिवस सलग पडत असलेल्या धुक्यामुळे ज्वारीवर चिकट्या या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, सुरुवातीलाच जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे ज्वारीचा पेरा उशिरा झाला आहे. आता पुढच्या महिन्यात ज्वारी काढण्यात येतील. मात्र सध्या ज्वारीवर मोठ्या प्रमाणात चिकटा रोग पडल्यामुळे पिकांचे उत्पन्नात घट होते की काय या भीतीपोटी शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र या भागात निर्माण झाले आहे. शिवाय जर रोगाचे निर्मुलन झाले नाही, तर होणारा कडबा जनावरांना खायला घालावा की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये सध्या या भागातील शेतकरी असल्याचे दिसते आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.