परंडा (प्रतिनिधी )दि.२१ उस्मानाबाद लोकसभा अनुषंगाने परंडा-भुम-वाशी मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची अत्यंत महत्त्वाची बैठक येथील भैरवनाथ साखर कारखाना स्थळी पार पडली. या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठीकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मताधिक्क्याने आम्ही निवडून आणणारच अशी भीष्मप्रतिज्ञा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठकीच्या माध्यमातून जाहीर केली.
निवडणूक आयोगाकडून लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात जागा वाटपावरून मोठा घडामोडी घडू लागल्या आहेत. त्याचे तीव्र पडसाद ग्रामीण भागातल्या राजकारणावर उमटू लागले आहेत. परिणामी विविध पक्षाकडून बैठकीचा जोर वाढला आहे. याच अनुषंगाने येथील भैरवनाथ साखर कारखान्यावर लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती तयार करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभेचे संभावित उमेदवार धनंजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब हाडोग्रीकर माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, माजी सभापती दत्ता मोहिते, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आर्चना दराडे, शिवाजीराव भोईटे, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके, मारुती महाराज बारसकर, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे आदी उपस्थित होते. श्रेष्ठीकडून महायुतीचा उमेदवार जो कोणी दिला जाईल त्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याची भीष्मप्रतिज्ञा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीच्या माध्यमातून घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभापती दत्ता मोहिते, अण्णासाहेब देशमुख, मारुती महाराज बारस्कर, शिवाजीराव भोईटे, शिवसेना महिला आघाडीचे अध्यक्ष अर्चना दराडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये बुथ कमिटीच्या सदस्यांना महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या. परंडा-भूम-वाशी मतदार संघातील सोशल मीडियावर ॲक्टिव्हपणे काम करणाऱ्या सदस्यांशी धनंजय सावंत यांनी थेट संवाद साधला. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सोशल मीडियावर प्रभावितपणे काम करण्याच्या सूचना सावंत यांनी सोशल मीडियाच्या सदस्यांना दिल्या. बैठकीला भूम परंडा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.