अनाळा प्रतिनिधी (०७) मलकापूर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शरदचंद्र पवार गटाची पहिली तुतारी वाजण्याच्या मान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप खोसे-पाटील यांना मिळाला असून, सरपंचपदी चित्रा ठोंबरे तर उपसरपंचपदी लक्ष्मी डुकळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. निवड जाहीर होतात ग्रामस्थांनी गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य दैवशाला तेरकर, कालिदास निरवणे, सुक्षला कुतवाल, सुदामाती शिंदे, भारत हिवरे, नसीरभाई शहाबर्फीवाले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष हरी नाईकवाडी, नंदकुमार शिदे, लक्षमण पाटील, नारायण पाटील, बाळासाहेब बिडवे, कैलास तेरकर, लक्ष्मण भोगील, मारुती भोसले, रामा ठोबरे, गोकुळ तेरकर, आप्पासाहेब कुतवल, धर्मराज तेरकर, अण्णा जरे , धनु निरवणे, मारूती ठोंबरे, बापू ठोंबरे, अनिल ठोंबरे, पोपट ठोंबरे, पांडु ठोंबरे, अशोक काळोखे, नाना भोरे पप्पू सरवदे, रेवण काळुखे, बापू कुदळे,नाना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.