धाराशिव दि 21 भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास धाराशिव लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामदास कोळगे यांनी म्हटले आहे. श्री कोळगे यांनी पुढे म्हटले आहे की,मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत आहे स्वर्गीय डॉ विमलताई मुंदडा यांच्या सन 1989 च्या लोकसभा निवडणूकीपासून भारतीय जनता पार्टीचे काम करीत असून भारतीय जनता पार्टीचे झुंजार नेते अँड मिलिंद जी पाटील यांची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता किसान मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राम मंदिर आंदोलन, हैदराबाद येथील अलकबिर कत्तलखाना हटाव मोहिमेत सहभाग नोंदविला बजरंग दल, विश्व हिंदू परिषद एकंदरीत परिवार म्हणून काम केलेले आहे पक्षाच्या सर्व पातळीवर काम करून पक्ष वाढीसाठी पक्षाला बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनात काठ्या लाठ्या खाऊन तत्कालीन विरोधी पक्षाला आव्हान दिले तसेच विरोधी पक्षाच्या कसल्याही दबावाला भीक न घालता आर्थिक तडजोडी न करता भाजपची सत्ता नसताना भारतीय जनता पार्टीचा आपण खांद्यावर घेतलेला झेंडा तो डौलाने कसा फडकत राहील याचाच विचार करून अद्याप पर्यंत आपण सक्रीय आहोत पार्टीचा प्रत्येक कार्यक्रम सर्वसामान्य लोक शेतकरी कष्टकरी गरीब अशा अठरापगड जातींच्या लोकांपर्यंत नेऊन धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी बळकट करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष बापु देशमुख यांच्या माध्यमातून अटलपणन या मराठवाडा स्तरीय समितीवर काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर डॉ . बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखाना केशेगाव या कारखान्यावर शेतकऱ्यांसाठी तज्ञ संचालक म्हणून काम केले 1997 साली सर्व प्रथम धाराशिव पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी मिळाली सलग तीन वेळा पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केले यावेळी उपसभापती ही म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वसामान्यांचा आवाज मोठा करण्यासाठी प्रयत्न करत असून सध्याच्या काळात निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी जिल्ह्यात ओळख आहे त्यामुळे समोरील कसल्याही तगड्या उमेदवाराचा पराभव करू शकतो त्यासाठी आपण एक सक्षम उमेदवार ठरु शकतो असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री अमित जी शहा. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे,माजी सहकार मंत्री सुभाष बापु देशमुख, ज्येष्ट नेते अँड मिलींद जी पाटील, माजी आमदार सुजितसिंह जी ठाकुर ,आमदार राणाजगजीतसिंह दादा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य यांनी आपणास संधी दयावी असे श्री कोळगे यांनी म्हटले आहे .


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading