परंडा,ता.२० (तानाजी घोडके)ऐतिहासिक वारसा,भुईकोट,गडकोट किल्ल्यासह शालेय वयोगटातच इतिहासाची गोडी निर्माण व्हावी म्हणुन शेळगाव ता.परंडा येथील सनराईज इंग्लिश स्कुल शाळेच्या शालेय मुलामुलींनी नुकताच शहरातील भुईकोट किल्ला पाहणीचा आनंद घेतला.

भुईकोट किल्लापाहणीसाठी नेहमीच दुरगावाहुन पर्यटकांची गर्दी असते.हा मध्ययुगीन लष्करी स्थापत्यशास्ञाचा अजोड नमुना म्हणुन सर्वदुर सुप्रसिध्द आहे.ऐतिहासिक वारसास्थळांचे ज्ञान आत्मसात व्हावे याहेतुने सनराईज इंग्लिश स्कुल शाळेच्या विद्यार्थ्यांची वनभोजन टीफिन डब्ब्यासह येवुन फेरफटका सहल काढली होती. यावेळी आलेल्या शालेय मुलामुलींना किल्ल्याचा इतिहास, बांधकाम आणि परंड्याच्या राजवटीतील योगदान याविषयी व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हाउपाध्यक्ष दैनिक "सकाळ"चे पत्रकार प्रकाश काशीद यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देवुन छञपती शिवरायांचे धाडसी बालपण,शिवरायांचे आरमार,गणिमीकावा आदिसह भुईकोट,गडकोट किल्ल्याविषयी माहिती सांगितली.
विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ला आणि संरचनेत रस घेत, विचारमंथन केले. तसेच, सोनारी येथील काळभैरवनाथ मंदिरासही भेट देत धार्मिक व स्थानिक मंदिर परिसराची माहिती जाणून घेतली.या शैक्षणिक सहलीस शिक्षक प्रकाश शिंदे, राहुल शिंदे, व पालक प्रतिनिधी संतोष बाटे सहभागी होते. किल्ला संरक्षण व इतिहासाच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी कटिबद्धतेचे वचन दिले. ही भेट त्यांच्यासाठी आनंददायी ठरली.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading