तालुक्यातील कारंजा येथील पवार उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भगवान पवार यांना महाराष्ट्र जीवन गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधुन समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्ग, विसावा सोशल फाउंडेशन, पुणे व हिरकणी महिला विकास संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ जानेवारी रोजी पुणे येथे राष्ट्रीय युवा सामाजिक संमेलन २०२५ उत्सव संस्कृतीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा कार्यक्रम पूणे येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात परंडा तालुक्याचे सुपुत्र पुणे उद्योजक रामचंद्र भगवान पवार यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा तसेच समाज प्रबोधन, जनजागृती, वैचारिक क्रांती, धर्म, समाज, संस्कृती, कला, युवा, या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र जीवन गौरव सन्मान पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. रामचंद्र पवार यांना मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.