माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसविणे कैलीपर्स यांचे मोजमाप व ऑन द स्पॉट वितरण शिबीराचे आयोजन एस आर ट्रस्ट जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव व स्थानिक स्तर समिती धाराशिव सदस्य संस्था रा. स्व. संघ जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने कृत्रिम साहित्य तपासणी व वितरण शिबीर आयोजित करणे उक्त संदर्भीय पत्रान्वये या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. तरी खालील प्रमाणे तालुका निहाय शिबीराचे आयोजन करण्यात यावे.
1 धाराशिव, कळंब 2 उमरगा 3 लोहारा 4 तुळजापूर 5 भूम. परंडा
शिबिराचे ठिकाण
21/01/2025 पंचायत समिती सभागृह, धाराशिव
22/01/2025 श्रमजीवी फार्मसी कॉलेज, मेन रोड,
उमरगा जि. धाराशिव
23/01/2025 भारत माता मंदिर, बस स्टैंड शेजारी, मेनरोड, लोहारा 24/01/2025 पंचायत समिती सभागृह, तुळजापूर
25/01/2025 पंचायत समिती सभागृह, भूम
वरील प्रमाणे दिव्यांगांसाठी कृत्रिम हात, पाय व कैलीपर्स वितरण करण्याबाबत शिबीराचे आयोजन करावयाचे आहे. उपरोक्त ठिकाणी शिबीराबाबत ALMICO यांच्या वतीने करण्यात येत आहे असे दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके यांनी अव्हाहन केले आहे.
व्यवस्थापकीय सुविधा उपायोजना
1. शिबीराच्या ठिकाणी दिव्यांगांना बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. 2. शिबीराच्या ठिकाणी लाईट थी व्यवस्था असावी. 3. तालुक्यातील दिव्यांगांना ग्रामसेवकांमार्फत सुचित करण्यात यावे. 4. शिबीराची प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. 5. केवळ कृत्रिम हात, पाय व कैलीपर्स आवश्यकता असणाऱ्याच दिव्यांगांना शिबीराकरिता निरोप दयावा. 6. दिवसभर चालणाऱ्या शिबीरामध्ये आपण व्यक्तीशः उपस्थित रहावे. तरी धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे अव्हाहन दिव्यांग उद्योग समुह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने केले आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.