परंडा शहरासह तालुक्यातील अनेक गावात सध्या पाऊस पडत आहे शेतकरी राजाने पेरणीपूर्व मशागत केली असून आता पेरणीची ओढ लागलेली आहे पेरणी पूर्वतयारी साठी बी बियाणे तसेच खत खरेदीसाठी तालुक्यातील बळीराजा परंडा शहरासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहे
पेरणीसाठी बी बियाणे व खतांच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालक चढ्या दराने विक्री करत आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून प्रशासन गाफील असल्याचे चित्र दिसत आहे
तरी बळीराजाची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा तसेच शेतकऱ्यांची आडवणूक करून ज्यादा पैसे घेत असलेल्या कृषी केंद्र चालकांवर वचक बसावा म्हणून कठोरात कठोर कारवाई करावी
अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.