मुंबई: (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकाराच्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सोलापूर येथील पत्रकार हर्षद लोहार यांची निवड केल्याचे राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर तथा राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ यांनी जाहीर केले. येत्या रविवारी हर्षदसह सर्व पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा बार्शी येथे संपन्न होणार आहे..!
पत्रकार व पत्रकारिता चांगल्या पद्धतीने अंमलात आणली गेली पाहिजे. या उद्देशाने काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाने डिजिटल मीडिया विंग सक्षम करून, या विंगच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना न्याय देण्याचे काम करण्यात येणार आहे.
डिजिटल मीडिया विंगच्या पत्रकारांना अधिकृत मान्यता, शासनाच्या विविध सोयी व सवलती मिळाव्यात म्हणून काम करण्यात येणार असल्याचे नुकतेच नियुक्त झालेले प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. येत्या काही दिवसात राज्याची कार्यकारणी आणि सर्व जिल्हाअध्यक्ष यांची निवड करणार असल्याचेही यावेळी लोहार यांनी सांगितले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी लोहार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त डिजिटल मीडिया पत्रकारांनी व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद व्हावे असे आवाहन प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी केले आहे.
लवकरच डिजिटल मीडिया विंगची उर्वरित राज्य कार्यकारिणी लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीतून निवडली जाणार आहे. डिजिटल विंगचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस दिगंबर महाले, राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे यांनी अभिनंदन केले.
रविवारी बार्शीत होणार पदग्रहण सोहळा..!
व्हॉईस ऑफ मीडिया (डिजिटल मीडिया विंग) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारिणीचा भव्य पदग्रहण सोहळा रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं.६ वा.मोरया फंक्शन हॉल, बार्शी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी संदीप काळे (संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया) तर प्रमुख अतिथी म्हणून अजित कुंकूलोळ (राज्य उपाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया), सुरेश शेळके (कर सल्लागार व संचालक व्हॉईस ऑफ मीडिया),
एफ.आर. शेख (तहसीलदार, बार्शी) बाळासाहेब चव्हाण (मुख्याधिकारी, बार्शी नगरपालिका) आदी उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार (सोलापूर) , कार्याध्यक्ष अशोक घावटे (पुणे) , कार्याध्यक्ष बाळासाहेब भालेराव (ठाणे) , उपाध्यक्ष अश्विनी पुरी (नाशिक) , उपाध्यक्ष मनोज घायाळ (धाराशिव) , सचिव इर्शाद शेख (पुणे) , सहसचिव प्रसाद कानेटकर (अकोला) , खजिनदार प्रवीण पावले (सोलापूर) , कार्यवाहक संतोष शेलार (सोलापूर) , राज्य संघटक दीपक ढवळे (सांगली) यांना व राज्यभरातील सर्व राज्यकार्यकारणी जिल्हाध्यक्षांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शी शहर,तालुका व कर्मवीर ढोल-ताशा ध्वज,पथक बार्शीचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.