परंडा माझं गांव माझं शहर : प्रवीण रणबागुल युवा मंचच्या वतीने पुणे येथे भूम, परंडा, वाशी तालुक्यातील नागरिकांचा पारिवारिक स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी परिसरातील खंडोबा माळ . येथे रविवारी (दि. २९) हा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रविण रणबागूल युवा मंचच्या वतीने भूम, परंडा, वाशी तालुक्यातील . पुणे येथे उद्योग व्यवसायासाठी , स्थायिक झालेले व पुणे शहरात आपल्या व्यवसायात वेगळा ठसा – उमटविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान युवा मंचच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये परंडा तालुक्यातील तानाजी आदलिंगे (अरणगाव), सोमनाथ बोंडरे (कपिलापुरी), सचिन सोनारीकर (सोनारी), फारुख अरब (जवळा), बालाजी बनसोडे (परंडा), विजय धेंडे (शेळगाव), भूम तालुक्यातील गणेश देशमुख (ईट), राहुल इजगज ( माणकेश्वर ), सतीश पालके (वांगी बु.), सुरज कुचेकर (चिंचपूर), अॅड. शिवाजी महानवर (सावरगाव पा.), लहू गायकवाड (भूम), भरत महानवर (सावरगाव पा.), बापूराव गोंदवले (सावरगाव पा.), हुंबे ट्रान्सपोर्ट (घाटनांदुर), वाशी तालुक्यातील किशोर केळे (केळेवाडी), मच्छिंद्र सारूक (नंदगाव), अमोल शिंदे (बोरी), विकास शिनगारे (पारा), ज्ञानोबा गायकवाड (हातोला), हनुमंत वाघमारे (गिरवली), महेश जोशी (धाराशिव) यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, अँड. सर्वजीत बनसोडे, आप्पासाहेब तरटे, संजीवन खांडेकर, महेश जोशी यांच्यासह भूम, परंडा, वाशी तालुक्यातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील व प्रा. संदीप शिंदे यांनी तर आभार अतिक शेख यांनी मानले.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading