धाराशिव (दि-१२) भाजपाचे जिल्हास्तरीय अधिवेशन व विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.
माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथे आयोजित या अधिवेशनाला पदाधिकाऱ्यांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवून आणण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या काळात यशस्वी झाला. धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सप्टेंबर महिन्यात सुरु होऊन तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गावर येईल. टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषयही मार्गी लागला आहे. त्याचबरोबर तामलवाडी, वाशी, होर्टी येथील एमआयडीसी प्रकल्पही लवकरच सुरु होतील. पर्यटनाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न आहे. मराठवाड्यातील वर्ग २ मध्ये घेतलेल्या जमिनी पुन्हा वर्ग १ मध्ये घेण्याच्या महायुती सरकारने घेतल्याच्या निर्णयाने लाखो नागरिकांना थेट लाभ झाला आहे.
महायुती सरकार खऱ्या अर्थाने वेगवान विकासाचे कार्य करत आहे. लोककल्याणकारी काम करत आहे. “लाडकी बहीण” सारख्या अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत आहे. आपल्याला केवळ या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, आणि केलेले कामाविषयी जागृती करायची आहे. वेगवान विकासासाठी महाराष्ट्र पुन्हा भाजपा महायुतीला निवडून देईल.आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.