‘व्हिडिओ कॉल’ च्या माध्यमातून गोरे कुटुंबियांशी तात्काळ संपर्क साधला.
माझं गांव माझं शहर भूम :- मंगळवार दिनांक ११ जून रोजी भूम तालुक्यातील अंतरगाव येथील १७ वर्षीय अनुराधा गोरे या मुलीने आपल्या राहत्या घरी विषारी औषधं प्राशन केले. पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी अनुराधा गोरे हिच्या संपूर्ण शिक्षणाची व दवाखान्याची जबाबदारी घेत गोरे कुटुंबाला मदत करत धीर दिला.
याबात अधिकमाहिती अशी की, तालुक्यातील अंतरगाव येथील अनुराधा सहदेव गोरे या विद्यार्थींनीने बारावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविले होते. परंतु अनुराधाला तिच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची व सततची दुष्काळी परिस्थिती यामुळे तिला उच्च शिक्षणासाठी पैशांची अडचण येणार असे गृहीत धरून तीने विषारी औषध प्राशन केले. परंतु तिचे वडील सहदेव गोरे यांनी ही घटना पाहिल्याने त्यांनी भूम येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसून आल्याने तीला बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरील या घटनेची माहिती अंतरगांव येथील शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रामराजे गोरे यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून बालाजी गुंजाळ यांनी मुलीची प्रकृती पाहण्यासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. अनुराधा व तिच्या आई वडिलांना काही काळजी करू नका असे म्हणत पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्याशी फोन व्दारे संवाद साधला. यावेळी पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी अनुराधा गोरे शी संवाद साधत तिच्या संपूर्ण शिक्षणाची व दवाखान्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले. व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अनुराधाच्या आई व वडिलांनी पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचे मनापासून आभार मानले.
प्रतिक्रिया
पालकमंत्री सावंतांनी केला व्हिडीओ कॉल…पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी तात्काळ तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करत अनुराधाशी संपर्क साधत तब्येतीची विचारपूस केली. सावंतांनी अनुराधाला व तिच्या आई वडिलांना शब्द दिला की, उच्च शिक्षणासाठी येणारा खर्च व त्यासाठी लागेल ती मदत तसेच दवाखान्याचा खर्च स्वतः मी करतो. अजिबात काही काळजी करायची नाही आणि या पुढे आत्महत्या सारखा विचार मनात देखील आणायचा नाही असे बोलत गोरे कुटुंबियांना धीर दिला.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.