परंडा प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत शासनाने चक्क दिव्यांगाकडे पाठ फिरवली आहे. दिव्यांग व्यक्तींना मिळणारी संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना मानधन गेली दोन महिने झाले दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेले नाही ज्या गरीब गरजू अनाथ यांचा उदरनिर्वाह पेन्शनवर होत आहे ते दिव्यांग पेन्शनची आतुरतेने वाट पाहत आहे काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम राबवला पण महाराष्ट्र राज्यातील किती गरजू दिव्यांना या योजनेचा फायदा झाला हा प्रश्न आता दिव्यांकडून उपस्थित होत आहे आमदार व खासदार यांच्या पेन्शनमध्ये नेहमीच भरघोस वाढ होत आहे पण दिव्यांगाना महिना 1500 रुपये मिळणारी पेन्शन ही देखील वेळेवर मिळत नाही इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने वाढ करावी ती वेळेवर मिळावी याकरिता दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटना व संस्था यांनी शासन दरबारी दिव्यांगाच्या विविध अडचणी मांडण्यासाठी पत्रव्यवहार करावा असे दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी आपल्या संघटनेच्या निवेदनामार्फत शासनाकडे सादर केले आहे दिव्यांगाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे विविध योजना दिव्यांगाना दिव्यांगापर्यंत पोहोचत नाहीत त्याकरिता शासनाने दिव्यांगाचा विचार करून दिव्यांगाना लाभ कसा मिळेल याचा विचार करावा व दिव्यांगाना त्वरित मानधन अदा करावे शासकीय कार्यालयांमध्ये गेल्यानंतर दिव्यांगाना सन्मानाची वागणूक द्यावी व संबंधित विभागातील अधिकारी यांनी योग्य मार्गदर्शन करावे अशा माफक अपेक्षा दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी केली आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.