परंडा-(दि२८) ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील सोनारी येथे सखल ओबीसी बांधवांच्या वतीने गुरुवार दि.२७ जुन रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर बैठक संपन्न झाली. तत्पुर्वी ग्रामपंचायत कार्यालयापासून श्री काळभैरवनाथा मंदिरापर्यंत, एकच पर्व ओबीसी सर्व च्या घोषणा देत पायी राँली काढण्यात आली. यावेळी भुम व परंडा तालुक्यात शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते. श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन ग्रामपंचायत समोर बैठक घेण्यात आली. यावेळी ओबीसी बांधवांच्या वतीने आपला कोणत्याही जातीला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अठरापगड जातीतील नागरीकांनी मराठा समाजाला पाठींबा दर्शविला होता. मात्र आता मराठा समाज हा ओबीसी तुन आरक्षण मागत आहे. यामुळे ओबीसी तील समाजावर अन्याय होनार आहे. यामुळे ओबीसी बांधवांना आर्थिक , राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात नुकसान होणार असुन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासाठी ओबीसी तील अठरापगड जातीतील नागरीकांत जनजागृती करुन येणार्या काळात आंदोलात्मक पावले उचलण्या संर्दभात बैठकीत निर्धार करण्यात आला. यावेळी शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते.
चौकट….
बीड जिल्यातील मातोरी गावातील ओबीसी बांधवांनवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ शुक्रवार दि २८ जुन रोजी परंडा तालुक्यात सोनारी येथे सखल ओबीसी बांधवांच्या वतीने एक दीवस गाव बंदची हाक देऊन गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.