परंडा,ता.४ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत अग्रेसर आहेत.माझेही शालेय शिक्षण ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतच झाले आहे.व्हाईस ऑफ मिडीया पञकार संघटनेने गरजु,अनाथ मुलामुलींना शालेय उपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.असे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी व्यक्त केले.
येथील जिल्हा परिषद कन्या व केंद्रीय प्राथमिक शाळा येथे व्हाईस ऑफ मिडीया पञकार संघटनेच्यावतीने गुरुवार ता.४ रोजी शाळेतील पहली ते आठवी वर्गातील गरीब,अनाथ,होतकरु असलेल्या एकीण ५० मुलामुलींसह पञकारांच्या गुणवंत पाल्यांना शालेय उपयोगी दप्तर,प्रत्येकी सहा वह्या,पेन,कंपास आदि साहित्याचे वाटप जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हाशिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव,शालेय समिती अध्यक्षा शमशाद इनामदार, विस्तार अधिकारी अशोक खुळे,सुर्यभान हाके,दादासाहेब घोगरे,शिवाजी काळे,केंद्रप्रमुख महादेव विटकर, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती साविञिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन दिपप्रज्वलन करुन झाली.यावेळी बोलताना डॉ.घोष म्हणाले की,जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींनी स्पर्धेच्या युगात जिद्द,चिकाटीने अभ्यासात सातत्य ठेवावे असे सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात शालेय मुलींनी स्वागतगीतावर नृत्यअविष्कार सादरीकरण करुन मने जिंकली.प्रस्ताविक करताना मुख्याध्यापक अंकुशराव जाधव यांनी जिल्हा परिषद शाळेतील विविध शालेय उपक्रम व गुणवत्तेविषयी माहिती दिली.यावेळी शिक्षिका शांता ठाकुर,उषा विधाते,पल्लवी चव्हाण,संतोष ओव्हाळ,दिपा मुंढे,दादा लांडगे,हनान बरोटे आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद,तालुका कार्याध्यक्ष मुजीब काझी,प्रमोद वेदपाठक, तानाजी घोडके,आप्पासाहेब शिंदे, संतोष शिंदे, रावसाहेब काळे, रवींद्र तांबे, अलीम शेख, श्रीराम विद्वत,नाना केसकर, दत्ता नरुटे, फारुख शेख, समीर ओव्हाळ,धनंजय गोफणे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासविद्यार्थी व पालक,नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी घोडके यांनी केले
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.