परंडा(दि.२६) परांडा येथील शासकीय विश्राम गृह येथे महात्मा फुले समता परिषद व डी.बी.ए समूहाच्या वतीने 150वी राजर्षी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले समता परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष माननीय आबासाहेब खोत,महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे,डी.बी.ए समूह संस्थापक /अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे एडवोकेट दयानंद धेंडे, बौद्धाचार्य दिलीप परिहार यांनी सामुदायिक राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली यावेळी आरक्षणाचे जनक, समाज सुधारक लोकशाहीचे पुरस्कर्ते, लोक कल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर मान्यवरांनी विचार मांडले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या पेन व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी जि प प्रशाला इंदिरा वस्ती या शाळेतील शिक्षक आप्पा बल्लाळ सर, दत्ता कुमरे सर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष दीपक भोसले, नवनाथ राव गोरे, महाराज कानिफनाथ गोरे, भीमराज शिंदे, भाऊसाहेब ओव्हाळ, स्वप्निल ढेरे, रोहन ओहाळ, सागर यशवंद, , सम्यक धेंडें, सूर्योदय सरवदे, भारत पवार पैलवान, नवनाथ ननवरे, गोपाल अलबते, दिनेश पाटील इत्यादी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी आभार दयानंद बनसोडे यांनी मांडले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.