परंडा-माझं गांव माझं शहर दि.(२२)
परंडा येथील वीज वितरण कंपनी च्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांतुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे गेल्या एक महिन्यापासून वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत आहे स उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यावर वयोवृद्ध नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन बसवा लागत आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे वीज कधी येईल अशी विचारणा करायची म्हणटले तर वीज कंपनीचा फोन नेहमीच बंद असतो दुर्दैवाने जर शहरात एखादी दुर्घटना घडली तर कोठे फोन करून सांगावे हा प्रश्न महत्त्वाचा आहे वीज कंपनी नेहमी च बील दरवाढ करते पण तश्या सुविधा देत नाही त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तसेच या महावितरण कंपनी मध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ कर्मचारी हे परंडा शहरात राहत नसुन आपल्या सोईनुसार येऊन परंडा तालुक्यातील वीज कंपनी चा कारभार चालवित आहेत तेव्हा महावितरण कंपनी च्या वरिष्ठ अधिकारी यांनी अचानक पणे परंडा येथे येऊन पाहणी करावी व जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत त्याच्या वर कडक कारवाई करण्यात यावी तसेच दरमहा वापरलेल्या वीज चे रीडिंग घेणे आवश्यक असताना ही घेतले जात नसलेल्या चे तक्रारी आहेत तसेच दरमहा बीलाचे वाटप व्यवस्थित पणे केले जात नाही तेव्हा महावितरण कंपनी च्या वरिष्ठ अधिकारी यांनी या कडे लक्ष देवुन परंडा तालुक्यातील महावितरण चा कारभार सुधारवा अशी मागणी होत आहे


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

You missed

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading