परांडा( प्रतिनिधी) परांडा तालुक्यातील वडनेर ता परंडा येथील रहिवासी पप्पूलाल लांडे यांनी जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय या ठिकाणी रितसर निवेदना द्वारे अशी मागणी केली आहे की परंडा तालुक्यात अवैध दारू दुकान्याचा सुळसुळाट सुटलेला आहे तरी या अवैध दारू दुकानदारांच्या त्रासामुळे आम्ही लायसनधारक दुकानदार यांना खूप त्रास होत आहे अशा अवैध दारू धंद्या च्या दुकानामुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे या मुळे शासनाचा परवाना असुन देखील बार बंद करावा लागला तरी अवैध दारू विकणारे यांच्यावर त्वरित प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तसेच राज्य उत्पादन शुल्क महसूल देखील बुडत आहे त्यामुळे याकडे त्वरित लक्ष देऊन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी यांनी निवेदनाद्वारे केले आहे याच्या प्रती पोलीस अधीक्षक शुल्क उपादन अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत शेवटी कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असलेल्या चा मनोगत व्यक्त केला
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.