आंतरवली सराटी :(प्रतिनिधी) निवडणुका असल्याने अनेकजण आपल्या नावाचा वापर करू शकतात. आपल्या नावाने पैसे गोळा केले जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी असले प्रकार होऊ नये म्हणून सज्जड दम दिला आहे. कोणी जर माझ्या नावाखाली पैसे गोळा करत असेल तर त्या लोकांचे पैसे वर्गणी काढून परत करण्यात येतील. कुणाचा कपडा घेतला म्हटलं, कुणाची चप्पल घेतली म्हटलं तर चप्पल तोंडावर फेकून मारेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण सर्वांनीच निवडणुकीचे अर्ज भरले तर योग्य होणार नाही. त्यामुळे एका व्यक्तीने एक अर्ज भरा. आपल्याला आपली ताकद दाखवायची आहेच. पण शिस्तही दाखवली पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले. ५-६ दिवसांत कळेल कोणते कोणते मतदारसंघ लढायचे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा आम्ही सन्मान करतोय. पण आमचं जे ठरलं आहे, तेच आम्ही करणार आहोत. मतदारसंघात एकच उमेदवार द्यायचं ठरलं आहे. जर एखाद्या मतदारसंघात फॉर्म ठेवण्यात आला तर त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि मॅनेज झाला, त्याला मराठ्यांशी काही देणे-घेणे नाही, आरक्षणाच्या मागणीशी काहीही देणे-घेणे नाही, त्याला कोण्यातरी पक्षासाठी मते खायचे आणि विभाजन करायचे, असा अर्थ घेतला जाईल.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.