परंडा : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने लातूर बोर्डातर्फे जाहीर करण्यात आला. शहरातील संत मीरा पब्लिक स्कूलचा (इंग्रजी माध्यम ) निकाल याही वर्षी १०० टक्के लागला असून सलग ११ वर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये कु. अनुष्का कोलते ९८.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्षदिप भांडवलकर याने 97.20% गुण प्राप्त करून द्वितीय तर रिषिता नागेश्वर पंडिरीला 96.60%, व समीक्षा टोम्पे 96.60%* गुण मिळवत शाळेतून तृतीय क्रमांक मिळवला. शाळेतून 90%च्या पुढे २४ विद्यार्थ्यानी गुण प्राप्त केले आहेत यामध्ये प्रांजल नांगरे 96.20%, प्रतीक्षा सुरवसे 95.60%, साक्षी साळुंखे 95.60%, पायल साबळे 95.40%, सिद्धी गोफणे 95.20%, पायल अनभुले 94.80%, अनुजा ठाकूर 94.60%, समृद्धी सरडे 94.00%, पूर्वा फलफले 93.40%, अथर्व तळेकर 92.00%, अविष्कार झिरपे 91.80%, संस्कृती मिसाळ 91.60%, यश चौतमहाल 91.40%, आदित्य काळे 91.20%, अथर्व जगताप 90.80%, आलीना काझी 90.60%, सानिका राऊत 90.60%, प्रेम चौधरी 90.40%, संस्कृती काळे 90.20%, सामर्था सूर्यवंशी 90.00%, शाळेतील एकूण ८१ विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्य प्राप्त ६८ विद्यार्थी, प्रथम श्रेणी प्राप्त ११ तर द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचे संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील, उपाध्यक्ष डॉ राहुल पाटील, सचिव डॉ उदयसिंह पाटील, संस्थेच्या डायरेक्टर डॉ शिल्पा पाटील व प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, पालक व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.