प्रतिनिधी:- परंडा तालुक्यातील चिंचपुर (बु) येथील विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा राखली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा नेते तथा माजी उपसरपंच युवराजसिंह रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यालयातील बारावीचा निकाल १०० % तर इयत्ता दहावीचा निकाल ९८.६६% लागला आहे.
दहावी मधुन प्रथम क्रमांक साठे आदित्य अशोक ९२.२०%, जाधव अश्विनी दत्ता दुसरा क्रमांक ९२% तिसरा क्रमांक शिंदे श्रृतिका पांडुरंग ९१.६०% तसेच देवकर आदित्य आजिनाथ ९१.४० % सुरवसे सुहानी शामराव ९०.६०%, सावंत माऊली पंडित ८९.८०%, रसाळ प्रणाली ईश्वर ८९.६०%, भिल्लारे ऋषिकेश आप्पासाहेब ८८.८०% आणि इयत्ता बारावीमध्ये प्रथम क्रमांक मोरे निकीता अभिमान ८२.५०% दुस- रा क्रमांक कदम तृप्ती तात्यासाहेब ८१.८३% तिसरा क्रमांक मोरे अमृता शहाजी ८०.५०% अनभूले निकीता अरूण ७९.५०% यांनी गुण प्राप्त केले अशा या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. या वेळेस विद्यालयाचे संस्थापक तथा माजी जिल्हा परिषद सभापती रणजितसिंह पाटील, युवा नेते तथा माजी उपसरपंच युवराजसिंह पाटील तसेच आजिनाथ देवकर, पांडुरंग शिंदे, विलास जाधव आदीसह पालक, गावातील ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक विका देवकर व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.