महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बससेवेला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंडा आगार व बसस्थानकात शनिवारी बसगाडीचे पूजन व प्रवाशांना गुलाबपुष्प व पेढे वाटून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
राज्य मार्ग परिवहन महामंडाळाने १ जून १९४८ रोजी प्रवासी नागरिकांच्या सेवेसाठी बससेवा सुरू केली. या सेवेला यंदा ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.तसेच वयोवृद्ध, महिलांसाठी अर्धे तिकीट, अपंगासाठी सवलतीच्या दरात प्रवासाची आजमितीस बससेवा सुरु होऊन ७६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथील परंडा बसस्थाकातील आलेल्या प्रवाशांचे, महिलांचे स्वागत साखर पेढे गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. शनिवारी सकाळी १० वाजता परंडा बसस्थानकात मान्यवर व प्रवाशांच्या उपस्थितीत आकर्षक सजावट केलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाचे एसटी बसचे पूजन करण्यात आले. एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी आदींसाठी बससेवा सुरु करुन चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केला आहे. .यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अबरार पठाण, आगारप्रमुख उल्लास शिनगारे, प्रवाशी संघटना अध्यक्ष किरण शहा, प्रकाश काशीद, प्रमोद वेदपाठक, संजय कदम, जुल्फीकार जिनेरी, कासीम मुलानी, वरिष्ठ लिपीक एस. एस. शिवलकर, डी. बी. चैतन्य, उमेश पालके, एन. के. नलवडे, राजाभाऊ घोगरे, बाबा मोरवे, विजय मेहेर आदी उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading