परंडा(प्रतिनिधी) हे दृश्य कुठल्या तांड्यावरील किंवा वाडी वस्तीवरील नसून ही परिस्थिती आहे .परंडा शहरातील बावची रोड वरील रस्त्याचे या रस्त्याने जास्तीत जास्त रा गे शिंदे कॉलेजला जाणारे विद्यार्थी, महात्मा गांधी विद्यालयात जाणारे विद्यार्थी, शिवनेरी नगर ,संगम पार्क येथे राहणारे नागरिक वयस्कर नागरिक शाळेतील मुलांच्या सायकली तसेच गाड्या यांचा वावर असतो. या रस्त्याने आठ ते दहा खेडेगावांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याची अशी दैनिय अवस्था आहे. या रस्त्याकडे ना बांधकाम विभागाचे लक्ष. ना नगरपालिकेचे लक्ष. किंवा पुढार्याचे लक्ष या रस्त्याला वालीच नाही अशी परिस्थिती परंडा तालुक्यातील बावची रस्त्याची झाली आहे .गेले अनेक महिन्यापासून याची अशी दुरावस्था झालेली आहे. सध्या तर बावची चौकामध्ये मधोमध खड्डा खांदून ठेवला आहे. यापासून नागरिकाला धोका होण्याची शक्यता आहे. एखादा माणूस मरण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न देखील नागरिकातून केला जात आहे. तसेच या रस्त्यावर पूर्वी ओढा होता तो सध्या गायब झाला आहे त्यामुळे या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे त्या पाण्याचा उग्र वास व दुर्गंधी सुटलेले आहे या ठिकाणी वसाहत आहे . डॉक्टरचा दवाखाना आहे आय टीआय कॉलेज आहे शेजारी लोक वस्ती असणाऱ्या रहदारीच्या रस्त्याची ही अवस्था आहे तसेच इतर कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या दुर्लक्षित भागाकडे प्रशासन लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न सोडवणार का याकडे सर्व विद्यार्थी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.