धाराशिव जिल्हा वारसास्थळांचे नवी दिल्ली येथे झाले सादरीकरण !

परंडा,ता.२२ (प्रतिनिधी) इंडीयन नॅशनल ट्रष्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इंटॅक) नवी दिल्ली येथे ता. १६ मार्च २०२४ रोजी झालेल्या वार्षिक बैठकीत परंडा येथील आजीव सदस्य अजय माळी यांनी धाराशिव जिल्हयातील वारसास्थळांवरील व परंडा भुईकोट किल्लावरील पुस्तकांचे सादरीकरण केले.दिल्ली येथे वार्षिक सभेसाठी माळी यांना विशेष निमंत्रण दिले होते.
संशोधक अभ्यासक अजय माळी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षांनिमित्त, धाराशिव डिस्ट्रीक्ट हेरिटेज प्लेसेस व परंडा किल्ला ही दोन पुस्तके लिहीली आहेत. या पुस्तकांचा उददेश संस्कृती मधून सन २०३० पर्यंत विकास व युनेस्कोची शाश्वत १७ उददीष्टां पैकी ११.४ हे उददीष्ट म्हणजे वारसास्थळांची जपणूक करून त्यामधून सांस्कृतिक विकास साधणे हे होय. या पुस्तकात त्यांनी अप्रतिम फोटोग्राफीचे प्रदर्शन केलेले आहे. यापुस्तकाच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा व परंडा किल्ला या पुस्तकांचे राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरणाने धाराशिव जिल्हयातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी होऊन धाराशिव जिल्हयाचा संस्कृतीमधून आर्थिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल.
इंटॅकच्या पदसिध्द सदस्यांमध्ये सचिव भारतीय संस्कृती मंत्रालय, सचिव पर्यावरण मंत्रालय, वन मंत्रालय, सचिव नागरी विकास मंत्रालय, डायरेक्टर नॅशनल म्युजियम, डायरेक्टर जनरल आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय नेवी, भारतीय आर्मीसह वारसाक्षेत्रात काम करणारे मान्यंवर तज्ञ संशोधकांचा समावेश सदस्यांमध्ये असतो. इंटॅकचा उददेश वारसास्थळांचे जतन संरक्षण करून त्यास प्रसिध्दी देणे हा आहे. इंटॅक जगातील सर्वात मोठे हेरिटेजची संघटना आहे. जी युनेस्कोला सल्लागार म्हणूनही काम पहाते. जीचा उददेश भारताची सांस्कृतिक, प्राकृतिक वारशांचे जनतेमध्ये जागरूकता तसेच प्रेरणा निर्माण करणे आहे. प्राकृतिक संसाधने व सांस्कृतिक संपत्तीचे परिरक्षण आणि संरक्षणासाठी उपाय योजने, परंपारिक कला, शिल्प यांचे परिरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे ई. प्रकारचे महत्वाची कामे इंटॅक करते


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading