परंडा (माझं गांव माझं शहर ) येथील सुवर्णकार व सराफ असोसिएशनच्या वतीने बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सोनार समाजातील एका चिमुकलीवर लैंगीक अत्याचार प्रकरणी तिव्र निषेध करीत आरोपीस कठोर शासन व्हावे अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सोनार समाजातील एका लहान चिमुकल्या मुलीवर शाळेतीलच नराधम शिक्षकाने अमानुषपणे अत्याचार केला.सदरील घटना निंदनीय असुन याचा तालुका सराफ व सुवर्णकार असोशीएशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.सदरील प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमास त्वरीत फाशीची शिक्षा द्यावी व पिडीत चिमुकली तसेच तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी परंडा सराफ व सुवर्णकार संघटना व बांधवांच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे.
निवेदनावर सराफ व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष मनोज शहाणे, उपाध्यक्ष विनोद चिंतामणी, सचिव नानासाहेब दिक्षित, मनोज चिंतामणी, नितीन महामुनी, प्रमोद वेदपाठक, दिपक दिक्षित, अनिल पेडगावकर, शिवप्रसाद बागडे, सागर लंगोटे, संदीप महामुनी, मदन महामुनी, दशरथ शहाणे, संतोष नष्टे, हनुमंत तांबे, शिवाजी पंडीत, विष्णु मुळीक, गणेश कवटे, संतोष कदम, अमोल क्षिरसागर, पुष्कर उदावंत, अंसार अतार आदीसह सुवर्णकार व सराफ संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व समाज बांधवाची स्वाक्षरी आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.