परंडा (माझं गांव माझं शहर ) शिराळकरांचे आधारवड : ज्ञानेश्वर तात्या पाटील
तात्या म्हणजे सर्वांची माऊली, तात्या म्हणजे गोरगरीब जनतेची होती सावली. जरी होते आमदार पण नव्हता कधीच गर्व, तात्याचा निरोप आला की हजर असायचे सर्व. कट्टर बाळासाहेबांचा मावळा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली भूम परंडा वाशी मतदारसंघाची तात्या होते मायेची सावली. तात्यांचा प्रवास होता खूप खडतर आणि स्वभाव होता नि:स्वार्थी तात्यांच्या माणुसकीची पसरली होती जिल्ह्यात कीर्ती. १९९५ ला झाले आमदार मित्र सुजितसिह ठाकूर साहेब अन कमांडर गाडी होती सोबतीला गोरगरिबांचा माऊली गरजला मुंबई विधानभवनाला. परंड्याचं वैभव तात्या,धाराशिव जिल्ह्याचे किंगमेकर तात्या तुमच्या अचानक जाण्याने प्रत्येकाला सारखचं आठवतायेत तात्या. अनेक दूरदृष्टीची विकासकामे मतदार संघात केली तात्यांनी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांशी मैत्री जपली माऊलींनी.गप्पा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मारणारा, गावातल्या पारावर बसून माणसांसोबत पानसुपारी खाणारा, फाटक्या कपड्यातल्या माणसाच्या सुद्धा खांद्यावर हात टाकून विश्वास देणारे आमदार होते तात्या. गेले ते दिवस अन राहिल्या त्या आठवणी फक्त सहवासाच्या शिक्षकांसोबत सुद्धा चर्चा करायचे शाळेच्या गुणवत्ता विकासाच्या. प्रत्येक जण आता हळहळत आहेत तात्यांच्या आठवणी काढत आहेत युवा नेतृत्व रणजित दादा लोकं आता तुमच्यात तात्या पाहत आहेत. अखेरचा जय महाराष्ट्र करण्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता. आमदार नसून तुम्ही खरंच माऊली होता याची साक्ष तो क्षण देत होता. शिवशाहीर शरद नवले यांच्या लेखणीतून तुम्हाला आदरांजली वाहतो तात्या कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, नोकरदारांचा, तालुक्याचा अन खास शिराळकरांचा आधार होते तात्या.
शब्दांकन : शिवशाहीर शरद नवले. शिराळा ता परांडा जि धाराशिव


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading