दि. १२- राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे. याच अभियानाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार, १४ सप्टेंबर रोजी परंडा शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी परंडा तहसील कार्यालयात घेतला.
कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, कार्यकारी अभियंता एन. व्ही. भंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, पालकमंत्री यांचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा स्तरावर महिला बचत गट संमेलन आयोजित करुन महिलांना प्रेरित करण्याकरिता योजना लोकाभिमुख अभियानांतर्गत विविध शासकीय त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहचविणे, महिला बचत गट स्टॉल उभारणे, विविध सरकारी विभाग व महामंडळाच्या योजनांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून या कार्यक्रमस्थळी लावण्यात येणार आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.