परंडा प्रतिनिधी – दि . ११ – परंडा तालुक्यातील अनाळा येथे महाराष्ट्र ग्रामिण बँकेद्वारे नवचेतना संवाद यात्रे अंतर्गत दि . १२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . शेतकरी वर्गाला पिककर्ज नुतनीकरण , व्याज परतावा आणि शासनाच्या प्रोत्साहनपर योजनांचे महत्व पटवून सांगण्यासाठी व संवाद साधण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . दि . ०५ जून ते १५ जून दरम्यान संपूर्ण मराठवाडयात फिरणारी हि यात्रा शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण आणि विकासाच्या दिशेने एक महत्व पुर्ण पाऊल ठरणार आहे . शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहीती देणे व त्यांच्या समस्याचे निराकारण करणे यात्रेचा उद्देश आहे . मराठवाड्यात तब्बल ५० ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . यामध्ये नियमित पिक कर्ज धारकांचा सत्कार व वृक्षारोपन करण्यात येणार आहे . या संवाद यात्रेचे आगमन अनाळा येथे दि. १२ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे . या कार्यक्रमात एटीएम मशीन चे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे . आर्थिक समावेशन , डिजीटल साक्षरता व सामाजिक सुरक्षा योजने बद्दल जनजागृती करण्यात येईल . तरी बँकेचे वतीने सर्व खातेदार , प्रतिष्ठित नागरिक , बचत गटातील महिला यांनी या संवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन अनाळाचे महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा व्यवस्थापक रवी चौधरी यांनी केले आहे .
महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने ०५ जून ते १५ जून या कालावधीत नवचेतना संवाद यात्रा आयोजित केली असून या संवाद यात्रेचे आगमन अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेत दि १२ रोजी आगमन होणार असुन यामध्ये पिककर्ज व व्याज परतावा या विषयी महत्त्वपूर्ण माहिती शेतकरी व बचन गट महिलाना देण्यात येणार आहे . तरी सर्व खातेदार शेतकरी ,बचतगट महिला यांनी नवचेतना संवाद यात्रेत सहभागी व्हावे –
रवी चौधरी ,
शाखा व्यवस्थापक
महाराष्ट्र ग्रामिण बँक,अनाळा ता . परंडा .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.