सोलापूर -(दि १७) आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्यात. त्यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत कोविड काळात लोकांना जबरदस्तीनं लस घ्यायला लावली. त्या लसीमुळे अनेकांना शुगर, बीपी आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला असा दावा त्यांनी केला. प्रणिती शिंदे यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचं कंत्राट मिळालं. त्यातून सीरमने भारतीय जनता पार्टीला १०० कोटी रुपये दिले. कोविड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास झाला त्यामुळे मी लस घेतलीच नाही असंही त्यांनी जाहीर सांगितले. त्याचसोबत सरकारने लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे आज कुणाला काही ना काही दुखणे सुरू झाले. ज्यांना काहीच नव्हतं अशांनाही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार चालू झालेत असा गंभीर आरोप त्यांनी केला.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading