इतिहासाचं एक पान
फाशीची शिक्षा मरेपर्यंत फाशी का झाली एक ज्वलंत उदाहरण दि. ९/१०/१९३८ (म्हणजे ८५ वर्ष्यापूर्वी ) दक्षिण सोलापूर येथे 1936 मध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील या मराठा समाजाच्या तरुणावर खुनाचा आरोप होता.ब्रिटिश सत्र न्यायालयने त्यांना फाशीची सजा ठोठावली, आपल्या मुलाला विनाकारण फाशीची सजा देण्यात आली हा अन्याय आहे मला न्याय पाहिजे असे बोलत पुंडलिक पाटील न्यायाल्यात रडायला लागले कारण शिवप्पाची बायको ही नुकतीच बाळंत झाली होती आणि शिवप्पाचा मुलगा हा फक्त ११ महिन्याचा होता त्या मुलाला शिवप्पाने ने सुद्धा बघितले नव्हते फक्त त्याला जेल मध्ये सांगण्यात आले होते तुझ्या पत्नीला मुलगा झाला आहे शिवप्पाचा बाप हा गावचा पाटील होता. पैसा, संपत्ती खूप होती मानसन्मान, उठ बस वैगरे गावात चांगली होती. त्यामुळे पुंडलिक सिद्दपा पाटील ( शिवप्पाचे वडील ) यांनी चांगल्यात चांगला वकील करण्याचे ठरवले आणि आपल्या मुलाची फाशीची शिक्षा रद्द करायची यासाठी पुंडलिक पाटील पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्यास आणि लावण्यास तयार होते.त्या साठी चांगल्यातला चांगला वकील शोधण्यासाठी गावो गावी शहरो शहरी फिरत होते खूप वकील, कायदेतज्ञ यांच्या कडे पुंडलिक पाटील जाऊन आले पण त्या सर्वांनी हात वर केले आता आम्ही काहीच करू शकत नाही न्यायालयाचा आदेश हा अंतिम असतो तुमच्या मुलाला फाशी होणार आणि त्यातून त्याला साक्षात देव जरी आले तरी ते सुद्धा त्याला वाचवू शकत नाही असेच सर्व नामवंत कायदेतज्ञ बोलत होते यात तर एक ब्रिटिश कायदेतज्ञ आणि त्यावेळेचे सुप्रसिद्ध वकील Henry Lutyens यांनी सुद्धा हार मानली होती. त्यांनी सुद्धा पुंडलिक यांना मी यात काहीच करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले. या सर्वांचे मत आणि त्यांची भूमिका पाहून पुंडलिक पाटील हताश झाले. ते आता फक्त आपल्या निष्पाप मुलाचा मृत्यू आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार होते .याच्या शिवाय त्यांच्या कडे काहीच नव्हते .असेच काही दिवस गेले तो फेब्रुवारी महिना होता पुंडलिक पाटील यांचे विजापूरचे एक नातेवाईक पुंडलिक पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांचे नाव अडवणे ते विजापूरमध्ये एक समाज सुधारक म्हणून कार्य करत होते. त्यांना पुंडलिक पाटील यांनी सर्व माहिती दिली. माझा मुलगा बेगुन्हेगार आहे पण सरकार खरा आरोपी सोडून एका निष्पाप मुलाला फासावर देत आहे मला न्याय पाहिजे त्यांनी अडवणे यांना सर्व सांगितले ते कोण कोणाला जाऊन भेटले मोठ्या मोठ्या वकीलाना जाऊन भेटले पण कुणीच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे येत नाही आणि माझी केस सुद्धा घेत नाही! पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर अडवणे यांनी त्यांना सांगितले आपण एक शेवटचा पर्याय म्हणून बॅरिस्टर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांना जाऊन भेटू ते खूप मोठे बॅरिस्टर आणि उच्च कायदेतज्ञ आहेत ते काहीतरी करतील असे बोलून अडवणे यांनी पुंडलिक पाटील यांना उद्या आपण मुंबईला जाऊन बॅरिस्टर आंबेडकर साहेबांना भेटू ते यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढतील अडवणे यांच्या अश्या विश्वासाच्या बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांच्या आशा उंचावल्या आणि त्यांना आशेचा किरण दिसून आला. ठरल्याप्रमाणे ते दोघे पुंडलिक पाटील यांच्या ऍम्बेस्यडर कारने मुंबईला निघाले दुसऱ्या दिवशी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटले नाही त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर विश्रांतीसाठी गेले होते असे त्यांना समजले ते तडक पनवेलच्या दिशेने निघाले ते पनवेल मध्ये रात्री पोहचले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यांना सकाळी येऊन मला भेटा मी बघतो तुमची काय केस आहे ती असे सांगितले,, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्या बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांचा उत्साह वाढला कारण आता पर्यंत ते ज्या ज्या कायदा तज्ञला, नामवंत वकिलाला जाऊन भेटले होते त्या त्या सर्व वकिलांनी त्यांना सॉरी आम्ही यात काहीच करू शकत नाही असे सांगितले होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना मी बघतो तुमची काय केस आहे यात मी बघतो हा शब्द फार दिलासादायक पुंडलिक पाटील यांना वाटला आणि त्यांना एक आशेचा किरण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये बघायला मिळाला! दुसऱ्या दिवशी सकाळी अडवणे आणि पुंडलिक पाटील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले त्या दोघांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोफ्यावर बसवून त्यांचे म्हणणे ऐकण्यास तत्पर झाले पण इथे एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे पुंडलिक पाटील हे दक्षिण सोलापूरचे असल्यामुळे त्यांना मराठी येत नव्हती ते कन्नड बोलायचे त्यामुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांची भाषा समजत नव्हती अखेर थोडीफार मराठी येत असलेल्या अडवणे यांना त्यांची भाषा भाषांतर करण्यास सांगितले पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची फाईल स्वतः जवळ ठेवून घेतली आणि सांगितले मी तुमची केस घेतली आहे मी फाशी सुनावण्याच्या वेळीस कोर्टात येईल आणि याला अजून 6 महिने आहे मी येईन तेव्हा कोर्टात आता तुम्ही निश्चित जा, ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर सत्र न्यायालात आरोपीची बाजू मांडण्यासाठी हजर झाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले आहेत ही वार्ता सोलापूर विजापूर आणि इतर आजूबाजूच्या गावांना समजली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी त्या सोलापूर शहराच्या कोर्टात हजारो लाखो लोकं जमले होते ( काही जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक सांगतात की,त्या वेळी सोलापूर शहरातील हॉटेल्स, दुकाने, यांच्या वरील सर्व खाद्य पदार्थ,साहित्य, पुस्तके आदी सर्व संपले होते. हा त्या दिवसाचा उच्चांक आहे ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोर्टात आल्यावर स्वतः त्या न्यायाधिशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले, केस चालू झाली .दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाल्यावर सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाने पूर्व फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करून आरोपीला फाशीची सजा सुनावन्यात आली,न्याया धिशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितले आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत आहोत तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतकेचं बोलले ठीक आहे मला मान्य आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे माझी काही हरकत नाही पण माझी एक अट आहे आरोपीला जेव्हा फाशी देण्यात येईल तेव्हा तुम्ही स्वतः आणि तुमचे न्यायालीन मंडळ तिथे हजर असायला हवे आता मी कुठलेच petition दाखल करत नाही दीड महिना गेल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा सोलापूर कारागृहात हजर झाले तिथे शिवप्पाला फाशी देणार होते त्या कारागृहात हजर झाले ठरल्याप्रमाणे आणि कायद्याच्या सचोटीत राहून न्यायालयीन कामकाज सुरू झाले. न्यायाधीश सुद्धा हजर झाले आरोपीला फाशी देण्यासाठी सर्व तयारी झाली आरोपीला फाशीच्या दिशेने आणण्यात आले, इकडे पुंडलिक पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी सदर भावना होती त्यावर खेद व्यक्त करत होते अडवणे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना याच्यातून काही तरी दिलासा पर्याय शोधून काढतील म्हणून पूर्ण विश्वास ठेवून होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर स्वतः फाशी द्या, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे स्पष्ट सांगत आहेत हे असे कसे ख्यातनाम बॅरिस्टर असे अनेक शंका कुशंका त्या दोघांच्या मनात प्रश्नांचे घर करत होते इकडे आरोपीला फाशीच्या तख्तावरआणले त्याच्यावर काळा कपडा टाकला हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे बसून बघत होते आणि न्यायाधिश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत होते जल्लादने आरोपी शिवप्पा याच्या गळ्यात फाशीचा दोरखंड टाकला त्यावर लगेच बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी stop the my lord असे बोलून न्यायाधीशाकडे बघून ओरडले न्यायाधिशाला काहीच समजले नाही बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा ओरडले stop the this actively my lord! न्यायाधिश बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत म्हणाले what’s the stupidity question? Why stop the court actively? बॅरिसर आंबेडकर ” my lord तुम्ही सजा फक्त फाशी देण्याची ठरवली होती,ती जीव घेण्याची नाही! तुमची सजा आता पूर्ण झाली तुमच्या न्यायालयीन कामकाजा नुसार आरोपीच्या गळ्यात फास अटकवला त्यात ती सजा पूर्ण झाली आता तुम्ही आरोपीला कुठली ही सजा देऊ शकत नाही आरोपी आता दोष मुक्त झाला आहे तुमची सजा आरोपीने पूर्ण भोगली आणि पुर्ण केली! आणि बॅरिस्टर आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे त्या ब्रिटिश न्यायाधिशाला मान्य करावे लागले (आणि तेव्हा पासून आरोपीला फाशीची सजा देताना मरे पर्यंत फाशी अशी सजा देण्यात येते )आणि शिवप्पा याची निर्दोष मुक्तता करण्यात आली! लेख खूप मोठा होईल पण जाता जाता थोडक्यात सांगतो आज ही पाटील यांच्या देवघरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तीवजा पुतळा आहे. आजची जी पाटील यांची पिढी आहे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रोज पूजा करते! आपण जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जी Ambassador कार बघतो ती पुंडलिक पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जन्मदिनाच्या दिनी भेट म्हणून दिली आणि पुर्ण गावात पुंडलिक पाटील यांनी सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हत्तीवर ठेवून पुर्ण सोलापुरात साखर वाटली होती .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.