माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींकरिता मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन दि २५ रोजी भूम येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शनिवारी करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव स्थानिक स्तर समिती सदस्य रा.स्व.संघ जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प, एस आर ट्रस्ट व अलिमकों यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी, दिव्यांगांना व्हिलचेअर, वॉकर, कृत्रिम हात, पाय, बूट आदी साहित्य वाटप करण्यात आले. सुमारे ५० दिव्यांगांनी याचा लाभ घेतला.
सदरील शिबिराचे उदघाटन पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, गटविकास अधिकारी मोहन राऊत व रा. स्व. संघांचे विभाग कार्यालय प्रमुख सचिन क्षिरसागर यांच्या हस्ते झाले अलिमकों चे डॉ. रुक्मिणी सोनेवाड यांनी बोलताना सांगितले की, दिव्यांग बांधव हा एक समाजातील महत्त्व – तळाचा घटक आहे. त्याला स्वतः च्या पायावर उभे राहता यावे, हालचाल करता यावी यासाठी आमच्याकडून नेहमीच सहकार्य केले जाते. दिव्यांगांना देण्यात आलेल्या साहित्याचा त्यांनी योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. दिव्यांग बांधवांना सदरील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रा.स्व. संघांचे ता कार्यवाहक गणेश कुलकर्णी यांनी केले. धाराशिव जिल्ह्यात या शिबिरामध्ये धाराशिव ४५, उमरगा ९०, लोहारा ६२, तुळजापूर ७० दिव्यांग बांधवानी लाभ घेतला आहे. शिबीर यशस्वीतेसाठी जनकल्याण समिती संवेदना प्रकल्पाचे व्यंकट लामजने, सचिन जाधवर यांच्यासह स्वयंसेवक व दिव्यांग उद्योग समुह या सामाजिक दिव्यांग संघटना जिल्हाप्रमुख व पदाअधिकारी यांनी परिश्रम घेतले. तर मोफत साहित्य मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी संस्थेचे आभार मानले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.