प्रतिनिधी (मुंबई) दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बच्चु भाऊ कडु यांच्या सह राज्यातील हजारो दिव्यांग मंत्रालय समोर सकाळी जमा होऊन मंत्रालय परीसर दणाणून सोडला पोलीस प्रशासनाची वाद झाल्यानंतर दिव्यांगांनी थेट आमदार निवास गाठले आमदार निवासाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली. आमदार निवासाचे द्वार बंद केले संभाजी नगर येथे झालेल्या विराट दिव्यांग आक्रोस मोर्चात दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते.परंतु दिड महीन्याचा कालावधी उलटून नहीं मागण्या मान्य होत नसल्याने दिव्यांगांनी मुंबई यावे लागले असल्याचे आ कडू यांनी सांगितले.दिव्यांगांना दरमहा सहा हजार व घरकुल योजनेची अडीच लाखांपर्यंत करावी.दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करून द्यावा.पाच टक्के राखीव दिव्यांग निधी दर वर्षी खर्च करण्यात यावा.आदी मागण्या मान्य करण्यात याव्या सकाळी दहा पासुन ते संध्याकाळी सहा वाजे पर्यंत दिंव्यांगांनी ठिय्या मांडला होता संध्याकाळी उशिरा अल्पसंख्याक मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी आमदार बच्चु कडु व दिव्यांगांची भेट घेऊन दिव्यांगाच्या सर्व मागण्या संदर्भात येत्या तिन दिवसांत कॅबिनेट मिटीग बोलवण्यात येऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगण्यात आले या उपोषणाला दिव्यांग उद्योग समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी घोडके व पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी राज्यातील दिव्यांग पदाधिकारी व शेकडो दिव्यांग बांधव हजर होते.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading