परंडा –परंडा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या मतदारसंघात आजपर्यंत पारंपारिक लढती झाल्या आहेत यंदा मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण राणबागुल हे या मतदारसंघातील वाड्या वस्तीवरील नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळे यंदा पारंपारिक लढतीला ‘ वंचित बहुजन आघाडी’ रोखणार का ? अशी चर्चा आहे.
परंडा मतदारसंघात राजकीय परिवर्तन ?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद सध्या सर्वत्र उमटत आहेत. त्यामुळे परंडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव जाणवणार असल्याचे मत जाणकारातून व्यक्त केले जात आहे . जरांगे यांचा कोणाला लाभ होईल हे देखील सध्या तरी सांगणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यांच्या भूमिकेमुळे परंडा विधानसभा मतदारसंघात नवी नांदी येण्याची शक्यता असल्याचे जाणकारातुन व्यक्त केले जात आहे.
विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेच्या होण्याचे संकेत असून त्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी मुंबई दौरे सुरू आहेत . पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे समजते .
परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार तथामंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे तर महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकरराव बोरकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे फिल्डिंग लावली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण रणबागुल हे नाव जवळपास निश्चित झाले आहे यावेळी परंडा विधानसभेची निवडणूक महायुती, मविआ, वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी सामना होण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.