वृक्षारोपन करून जपली वडिलांची आठवण .
अनाळा , प्रतिनिधी दि. २४ – परंडा तालुक्यातील इनगोदा येथील रहिवाशी तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते विश्वंभर श्रीरंग जगताप वय – ७५ यांचे दि. २२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . दि . २४ रोजी हिंदू परंपरेनुसार त्यांच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी मुलगा विश्वास जगताप व कुटुंबातील सदस्यांनी वडिलांच्या कार्याची आठवण व स्मृती कायम रहावी यासाठी केशर आंबा झाडाची लागवड करून त्यामध्ये वडिलांची रक्षा टाकून समाजाला एक चांगला संदेश दिला . त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .
इनगोदा ता परंडा येथील विश्वंभर जगताप यांचे निधन झाल्याने अस्थि विसर्जनाच्या दिवशी केशर आंबाचे रोपटे लावून त्यामध्ये वडिलांची रक्षा टाकून त्याची लागवड केली . यावेळी मुलगा विश्वास जगताप कुटुंबातील सदस्य , नातेवाईक व ग्रामस्थ .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.