परंडा प्रतिनिधी(29) दिव्यांग उद्योग समुह (महाराष्ट्र राज्य ) संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या पाठपुराव्यामुळे धाराशिव जिल्हायातून एकमेव परंडा तालुक्यातून कौडगाव ता.परंडा या गावातील ई रिक्षा लाभार्थी १०० % दिव्यांग सौ शारदा संतोष कुलकर्णी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिव्यांग ई रिक्षा योजना परंडा तालुक्यातील एकमेव लाभार्थी ठरले आहेत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कामासाठी पाठपुरावा केला यामुळे दिव्यांगाच्या मनामध्ये शासनाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे व हे शासन दिव्यांगासाठी विविध योजना राबवणारे शासन आहे असे दिव्यांगाने वाटते लाभार्थ्याला मिळालेल्या गाडीचे परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने ई रिक्षाची पुजा करताना दिव्यांग उद्योग समुह ( महाराष्ट्र राज्य ) संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी लाभार्थी सौ शारदा संतोष कुलकर्णी . दिव्यांग उद्योग समुह ( महाराष्ट्र राज्य ) परंडा शहर अध्यक्ष तथा पत्रकार गोरख देशमाने ‘ स्वानंद कुलकर्णी , विद्याधर कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading