जेकटेवाडी प्रतिनिधी : जेकटेवाडी व परिसरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्या मुळे या भागातील विहिरीनी तळ गाठल्याने पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसत आहे. जेकटेवाडी गावामध्ये तीन कुपनिलिका अधिग्रहण केल्या आहेत तसेच याचबरोबर एक पाण्याचा टँकर सुद्धा चालू आहे तरी नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे तसेच यंदाचा उन्हाळा नागरिकांना नको नकोशा वाटू लागला आहे . दिवेंस न दिवस उन्हाचा पारा वाढतच आहे त्यामुळे मानवी जीवना बरोबर पशुपक्ष्यांना या कडक उन्हाचा परिणाम होत आहे. कडक उन्हामुळे शेत मजुरांना काम करू वाटेना परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच वाढत्या उन्हामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे परिणामी दुध उतपादनात घट येत आहे त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक परिणाम होत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.