परंडा ,ता.१ (प्रतिनिधी ) श्री गणेश जंयतीनिमित्त शनिवार ता.१ रोजी शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एकमेव ट्रस्टी असलेल्या जय भवानी गणेश मंदीरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी दर्शनासाठी शहरातील महिलां,भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी “रक्तदान सर्वश्रेष्ठ दान” या सामाजिक उपक्रमात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकुण ५७ गणेशभक्तांनी उत्फुर्तपणे रक्तदान केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीनिमित्त, शहरातील जय भवानी चौकात भव्य मंडप उभारण्यात आला होता.मंदीरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.महिला मंडळानी गणेश जन्माचा पाळणा बांधुन मोठ्या भक्तिभावात गणेशाचे स्वागत केले.दुपारी १२ वाजता गणेशाची महाआरती करण्यात आली.गणेश मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी रक्तदान शिबीराचा शुभारंभ व्हाईस आॕफ मीडियाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद,महेबुब हन्नुरे यांच्या हस्ते करण्यात आले. जय भवानी गणेश मंडळाच्यावतीने रक्तदात्यांना पाण्याचे जार भेट देण्यात आले.सह्यार्दी ब्लड बँक धाराशिव यांनी रक्तसंकलन केले.शहर परिसरातील आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या उत्सवासाठी व रक्तदानासाठी गणेश मंडळाचे आण्णा लोकरे,आकाश काशीद, हणमंत हातोळकर,सनी काशीद,कुणाल जाधव,योगेश मस्के,पंकज नांगरे,विशाल काशीद,आदित्य नांगरे, वैभव मस्के,संतोष भालेकर,अतुल काशीद,आण्णा काटवटे, विनायक काटवटे,बाॕबी काशीद,वैभव मस्के,प्रतिक मस्के, करण काशीद, सुजय जाधव,विशाल काटवटे,ओंकार काशीद,आदिसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.मंदीरासमोर आकर्षक रांगोळी रेखाटली होती.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.