अनाळा(माझं गांव माझं शहर) दि ०३ -परंडा तालुक्यातील साकत ( खु ) , साकत [बु ] ,पिस्तमवाडी , रोहकल येथील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेची नोंदनी सीएससी केंद्रांवर करून घ्यावी. अँग्रीस्टॅक योजनेची नोंदणी निशुल्क आहे. शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्या साठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच, हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच अॅग्रीस्टॅक ह्या संकल्पने ची तालुक्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना ओळख (फार्मर आयडी) दिला जाणार आहे. ग्रीस्टॅक फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ, पिक कर्ज, अचूक हवामान अंदाज, मृदा आरोग्य तपशील
आणि योग्य पीक सल्ला मिळणार आहे. तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेणे सोपे होणार आहे. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच डिजिटल पीक कर्ज मिळवणेही या आयडीमुळे मिळवणे सोपे होणार आहे.
रोहकल ‘ साकत [ बु , ] साकत [खु ] ,पिस्तमवाडी येथील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या दूरदृष्टी योजनेचा फायदा
घेवुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करुन घ्यावेत. असे आवाहन परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या मागदर्शनाखाली कृषी सहायक सुहास गुंड यांनी केले आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.