धाराशिव(माझं गांव माझं शहर) दिव्यांगाला त्रास देणाऱ्या वामन व इतरांवर अपंग व्यक्तिचे अधिकार आधिनियम 2016 नुसार अट्रासिटाचा गुन्हा दाखल मौजे बामणी ता जि धाराशिव शिवारात गट नं २ मध्ये ३१ आर क्षेत्र दिव्यांग विठ्ठल बजरंग गायकवाड रा तांबरी विभाग धाराशिव यांच्या नावावर असून दि 29 जानेवारी 2025 रोजी दिव्यांग विठ्ठल गायकवाड पत्नी श्रीदेवी गायकवाड व मुलगा सिध्देश गायकवाड हे शेत नागरण्यासाठी गेले असता वामन मारुती गायकवाड गंगाबाई वामन गायकवाड व विरवनाथ वामन गायकवाड यांनी शेत नागरण्यास अडवले व यावर वामन व विश्ववनाथने दिव्यांग विठठलला मारहाण करून ढकलून दिले व गंगाबाई गायकवाड यांनी दिव्यांग श्रीदेवी स धक्काबुकी करून या सर्वांनी दिव्यांगत वर अपमानास पद बोलून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी या दिव्यांग कुंटबाला दिलेली आहे यावर बेबळी पोलीस स्टेशनमध्ये दिव्यांग विठ्ठल ने फिर्याद देऊन वामन गंगाबाई विश्वनाथवर भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ) 2023 नुसार कलम 352, 351(2),351(3),115(2),3(5), व अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 नुसार कलम 92 (अ), 92 ( ब) नुसार दि 29 जानेवारी2025 रोजी वामन गायकवाड गंगाबाई गायकवाड व विश्वनाथ गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर दिव्यागाच्या शेतावर गुंडशाही पद्धतीने केलेला कब्जा हाटवून त्याला स्वतःचे शेत करण्यास मिळावे या न्यायाची अपेक्षा सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.