प्रतिनिधी परंडा:- तालुक्यातील गोसावीवाडी (डोंजा ) येथे आरोग्यदूत डॉ. राहुल घुले हे सौ. कमल भिमराव घुले बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरासाठी आरोग्य टीम प्रमुख मैनादीन शेख, सुहास पाटील, मुतुर्जा सय्यद, मिनाक्षी काळे, डॉ. हसन सय्यद, सुरज बांगर आदींनी परिश्रम घेतले. आरोग्यदुत राहुल घुले हे भूम, परंडा, वाशी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांनी वृद्धांना आधार म्हणून काठी वाटप करण्याचे काम हाती घेतले आहे. भूम, परंडा, वाशी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गरजू रुग्णाच्या हजारो शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. तसेच तिन्ही भाऊ सौ. कमल भिमराव घुले बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना डीपी वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. यामुळे डॉ. राहुल घुले यांचे कौतुक होत आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading