माझं गांव माझं शहर (दि.२९) परंडा तालुक्यातील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चालू केले आहे याविषयी माहिती कि पोलिसांनी आकसबुद्धीने, हेतू पुरस्सर आणि बेकायदेशीरपणे उपविभागीय अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत परंडा तालुक्यातील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
तहसीलदार घनश्याम आडसूळ, नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, सर्व मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, महसूल सहाय्यक, शिपाई, वाहनचालक, कोतवाल सर्व महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी आहेत. तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनीही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत वरील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी राहतील अशी माहिती तलाठी संघटनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत कसाब यांनी दिली. महसूल कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने दिवसभर तहसिल मधील कामकाज ठप्प झाले होते. धाराशिव येथील पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading