धाराशिव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक २०२४ चा बिगुल जोरदार प्रचाराने सुरुवात चालू आहे. हा भिगुल 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरच शांत होणार आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील राजकारण कधी नव्हे एवढे खालच्या पातळीवर गेले आहे फोडाफोडीचे आणि गटातटाचे राजकारण सुरू झाल्यामुळे राष्ट्रीय पक्षांचे विभाजन होऊन सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावून काम करत आहेत. आपले पक्ष मजबूत करण्यासाठी कसोटी करत आहेत .
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट शिवसेना , अजित पवार राष्ट्रवादी गट यांची महायुती तर उद्धव ठाकरे गट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची महाविकास आघाडी याला प्रखरपणे लढा देणारी वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष एकमेकांसमोर उभे टाकले आहेत.
परंडा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे डॉ.तानाजी सावंत यांना उमेदवारीची खात्री असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराचा धुमधडाका चालू केला होता. तसेच पाच वर्षापासून भूम परांडा वाशी मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांनी खेड्यापाड्यापर्यंत जाऊन आपला प्रचार केला आहे. प्रत्येक उमेदवार आपले विकासाचे मुद्दे सांगून मतांची मागणी करत आहे.अशा प्रकारे सध्या जोरदार प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. विविध पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. वंचित बहुजन आघाडी कडून प्रवीण रणबागुल मैदानात आहेत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. त्यामुळे वंचित ओबीसी इत्यादी मतदार बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे .त्यांना गाव संवाद दौऱ्यात खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे यातूनच मतदारसंघाची चुरस आपल्याला पाहायला भेटते अशा या रिंगणात राष्ट्रीय समाज पक्षाकडून डॉ.राहुल घुले निवडणुकीसाठी रिंगणात उतरले असून त्यांनी मतदारसंघात अनेक कामे केलेली आहेत परंतु यावेळी मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे आलेले जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा फटका महायुती व महाविकास आघाडी यापैकी कोणाला बसणारे याची उत्सुकता लागलेली आहे अशा या राजकीय घडामोडीतून मतदारांचा कौल कोणाला मिळेलच याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.