जेकटेवाडी प्रतिनिधीः परंडा तालुक्यातील चिंचपुर(बु) येथील विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे माजी मुख्याध्यापक तुकाराम राजाराम केसकर यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती जिप धाराशिव रणजितसिंह पाटील व युवा नेते युवराजसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापराव वेदप्रकाश पाटील होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी तुकाराम केसकर यांचा सपत्नीक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की , शिक्षक म्हणजे समाजातील महत्वाचा घटक आहे. शिक्षक वर्गात धडा वाचतात आणि मुले शिक्षकांना वाचतात. शिक्षकांने विद्यार्थीप्रिय असावे आणि मुलांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असावी. शिक्षकांचे वाचन , त्यांचे बोलणे ,चालणे, वागणे या साऱ्याच गोष्टी मुलांवर परिणाम करत असतात तसेच पालकांनासुद्धा आपल्या पाल्याची काळजी असावी की आपल्या मुलांनी काय शिकावे व शिक्षकांनी काय शिकावावे कारण सध्या स्पर्धेचे युग आहे पण विद्यार्थ्याकडे आवड आणि जिद्द असल्यास त्याला कशालाच स्पर्धेची भीती नाही परंतु आता मुलांना भ्रमणध्वनीच्या अति वापरामुळे व्यसन लागले आहे. तरी त्यांनी काय करावे हे ठरवावे तसेच सत्कारमूर्ती तुकाराम केसकर बोलताना म्हणाले की , माझे प्राथमिक शिक्षण माझ्या जेकटेवाडी ता.परंडा या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले त्यांनतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण श्री.संत कैकाडी महाराज विद्यालय सोनेगांव.ता.जामखेड येथे झाले त्यांनतर अकरावी आणि बारावी व त्यांनतर बी एस्सी चे शिक्षण बार्शी.जि.सोलापुर येथे झाले. तसेच माझा बीएड ला नंबर लागला होता परंतु माझे शेतकरी कुटूंब असल्यामुळे माझ्या गरीब परिस्थितीमुळे त्यावेळी मला बीएड करता आले नाही परंतु बीपीएड केले. तसेच शाळेमध्ये १९९२ सालापासून आता पर्यंत शाळेची ३२ वर्षे अंखडित सेवा केली याचा मला अभिमान आहे. कै. सदाशिवराव (बाबा) पाटील यांच खुप आधार होता. रणजितसिंह पाटील यांनी मला वेळोवेळी मदत केली. माझी पत्नी मनिषा हिला २०१३ साली अपघात झाला यावेळी रणजितसिंह पाटील आणि शिक्षकांनी जी मदत केली ती कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी माजी विद्यार्थ्यानी खुप सहकार्य केले त्यामुळे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याप्रती प्रमाणिक सेवा केली तर कशाची उणीव भासत नाही. यावेळी युवानेते युवराजसिंह पाटील आणि विद्यार्थ्यानी आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी हभप तुकाराम महाराज भारती ,डॉ. प्रतापसिंह पाटील , रणजितसिंह पाटील , युवा नेते युवराजसिंह पाटील , माजी सभापती पंस भूम आण्णासाहेब भोगील , कृषीभूषण महाराष्ट्र राज्य आनंदराव देशमुख, विस्तार अधिकारी परंडा अशोक खुळे , आरोग्य अधिकारी निलंगा रोहित नवटके , पशुधन विकास अधिकारी डॉ.दत्तात्रय इंगोले ,माजी प्राचार्य नामदेव नागरगोजे ,माजी मुख्याध्यपक रामलिंग भोगील ,माजी प्राचार्य प्रकाश नागरगोजे , माजी मुख्याध्यापक नारायण भांडवलकर , माजी मुख्याध्यापक विक्रमसिंह राजे भोसले, हभप अशोक कुंभार महाराज, बिभिषण रोडगे, नारायण खैरे,भगवान वरळे , सुखदेव केसकर बाबासाहेब लांडे, रोहिदास रोमन , आण्णासाहेब रोमन , शहाजी तांबे, साबळे सर , शिंदे सर , रामा सुर्वे चुंबळी, बबन शिंदे , गजेंद्र शिंदे ,शहाजी तांबे , बाबु शिंदे, चत्रभूज बामदळे , बी.बी. गायकवाड, गणेश क्षीरसागर, मल्हारी भिल्लारे , भांडवलकर सर, संभाजी देवकर , कोडींबा केसकर , तानाजी रोमन , उपसरपंच जेकटेवाडी दगडू खामकर , दत्तात्रय ठाकरे, हंबीरराव लांडे , बिभिषण रोमन, भारत तांबे, गणेश जेकटे, आण्णा कोकाटे , बाळू मोरे, प्रदीप पाटील आदीसह पंचक्रोशीतील शैक्षणिक , राजकीय , सामाजिक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर हराळ तसेच सुत्रसंचलन रामकृष्ण गिरी यांनी केली व शेवटी आभारप्रदर्शन मुख्याध्यापक विकास देवकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापकसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गानी अथक परिश्रम घेतले.

Get WordPress help, plugins, themes and tips at MachoThemes.com

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading