परंडा(28) तालुक्यातील भोत्रा शिवारातील वाळू माफिया गोळीबार प्रकरणी फरार आरोपी पैकी एका आरोपीस अटक करण्यास पोलिसाना यश आले.आरोपी विजय शेलार यास बुधवारी दिनांक (26) अटक करून परंडा न्यायालयात हजर केले. असता त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यास आली परंडा तालुक्यातील भोत्रा सीना नदीपत्रात वाळूच्या व्यवहारातील पैशाच्या मागणीतून एका तरुणावर थेट गोळीबार करण्यात आला होता तर अन्य एका तरुणाला दगडाने गंभीर जखमी करण्यात आले होते या प्रकरणात एकूण सहा पेक्षा जास्त आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते या प्रकरणातील फरार असलेल्या सहा आरोपीमधील निखिल गोळे यास दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती त्यानंतर आरोपी विजय शेलार वय 20 याला बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात पकडण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे आरोपी शेलार या न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाचे पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे तर या प्रकरणात सुजित शेळके सुजित पवार किरण गोफने व इतर आरोपी अद्याप फरार आहेत अटक आरोपीला शनिवार( 29 )पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण धोंगडे यांनी दिली उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरामेठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी नियुक्ती केलेली तीन पदके इतर आरोपीचा शोध घेत आहेत .


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading