परंडा (प्रतिनिधी ) येथील नगरपालिकेला दिव्यांग 5% टक्के निधी संदर्भात दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने निवेदन सादर.
(१९)परंडा शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपालिका हद्दीतील शहरातील दिव्यांगाना हक्काचा दिव्यांग कायद्यानुसार तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांग 5% निधी मिळावा. गेल्या वर्षी देखील आम्हाला दिव्यांग निधी मिळालेला नाही तरी मा. मुख्याधिकारी नगरपरिषद परांडा यांनी सर्व दिव्यांग बांधवांचा विचार करावा आपल्या नगरपालिकेकडून आम्हाला मदत व्हावी आम्हाला आमचे जीवन जगणे मुस्किल आहे आणी त्यात आपण निधी दिला नाही आम्ही कसे जगावे . याकरिता आपण दिव्यांगांना पाच टक्के निधी सरसकट वाटप करावा या मागणीसाठी सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले हे निवेदन देताना दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख धाराशिव तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रेय रणभोर महेश देशमुख महेबुब दामटे नासेर शेख अनंत लोखंडे नाना तुटके शेख तसेच शहरातील सर्व सहकारी दिव्यांग बांधव व महिला दिव्यांग उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.