(शिर्डी) गेली अनेक वर्ष राजकारणात घराणेशाही सुरू असून ही घराणेशाही बंद झाली पाहिजे. येणाऱ्या काळात चांगला आमदार निवडून देण्याचे आवाहन आपल्या सर्वासमोर आहे. कारण आद्यापावेतो जेवढे आमदार निवडून दिले त्यांनी दुर्लक्ष केले असून येणा-या काळात आपण ही घराणेशाही मोडीत काढून आपल्या इच्छेनुसार आमदार दिला तरच आपणास इज्जत मिळेल असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार अशोकरावजी वानखेडे यांनी केले.
व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे शिखर राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. यावेळी वरिष्ठ पत्रकार अशोकराव वानखाडे, तुळशीदास भोईटे, सरिता कौशिक या पत्रकारांना
जीवनगौरवाने सन्मानित करण्यात आले त्यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातनाम
शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते या वरिष्ठ पत्रकारांना जीवनगौरानाने सन्मानित करण्यात आले. वानखाडे पुढे म्हणाले की, सगळीकडेच स्थित्यंतरे झाले परंतु राजकारणात म्हणावे तसेच स्थित्यंतरे दिसून येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे घराणे शाही होय ही घराणेशाही मोडीत काढली तरच येणारा काळ सुखाचा ठरेल. तद्वतच महाराष्ट्र घडवा महाराष्ट्र वाचवा असेही अशोक वानखाडे म्हणाले. ख्यातनाम शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे म्हणाले की, या सत्काराने माझाही सन्मान झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या यावेळी आरोग्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी आरोग्य विषयक माहिती दिली. पंचतारांकित धर्मादाय रुग्णालयाचाही पत्रकारांनी आणि सर्वसामान्य घटकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले निर्धन आणि दुर्बल घटकासाठी 20% खाट रिझर्व असून आतापर्यंत दोन टक्केच याचा वापर केल्याचे त्यांनी सांगत जस लोक हिंदुजा लीलावती अशा पंचतारांकित रुग्णालयातही विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध असूनही याबद्दल जनजागृती होण्याची गरज असल्याचे नाईक यांनी सांगितले. येत्या चार तारखेला याचे लोकार्पण होणार असून एक लाख 80 हजार उत्पन्न असणाऱ्या दुर्बल घटकाला या ठिकाणी शंभर टक्के मोफत इलाज दिला जातो तर दोन लाख ते तीन लाखापेक्षा उत्पन्न जास्त असल्याने 50 टक्के सवलत दिल्या जाते पत्रकारांसाठी काय करता येईल यासंदर्भातही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले येत्या काही दिवसातच विमा ची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे, भाजपा युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते, सहसचिव महसूल संजय इंगळे, उद्योजक राणा सूर्यवंशी अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आदी उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.