धाराशिव / प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) मा. केंद्रीय सहकार निबंधक नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक / (टेम्पलेट) नुसार बँकेची उपविधी तयार करण्यासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद ची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक ०६ – १० – २०२४ रोजी दुपारी १ -०० वाजता श्री संत ज्ञानेश्र्वर माऊली”सभागृह धाराशिव येथे बँकेचे अध्यक्ष मा. वसंतराव नागदे, उपाध्यक्ष वैजीनाथ शिंदे. सर्व संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके सर्व कर्मचारी बँकेचे सभासद, ठेवीदार ग्राहक व हितचिंतक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. प्रथम बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी होत असलेल्या विशेष सर्वसाधारण सभेबद्दल माहिती सांगितली. नंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी बँकेच्या उपविधी मध्ये काय – काय बदल/दुरुस्ती केली याची सविस्तर माहिती सांगितली व सभासदांनी त्यास टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. बँकेचे संचालक विश्र्वास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.