परंडा / प्रतिनिधी परंडा २४३ विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार मा. आ. राहुल मोटे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्यावर अनेक आरोप केले यावेळी पत्रकारांशी बोलताना मोटे म्हणाले की तानाजी सावंत हे फक्त खोटी आश्वासने देत आहेत त्यांनी मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली आहे. गेल्या निवडणुकीत हिंगणगाव, आसू येथील तलावात पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते ते का पूर्ण झाले नाही याची उत्तर त्यांनी द्यावीत . सध्या उमेदवार आपापल्या कामाचं पाढा मतदारांसमोर वाचत आहेत तर विरोधी उमेदवारांनी दिलेली आश्र्वासने पूर्ण झाली नाहीत याचे पुरावे ऑडियो , व्हिडिओ क्लिप द्वारे मतदारांसमोर मांडत आहेत
दि १४ रोजी तसेच इराचीवाडी येथील पाझर तलावाचे ८० टक्के काम मी आमदार असताना पूर्ण झाले सावंत यांनी त्यांच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात का पूर्ण केले नाही याचे उत्तर मतदारसंघातील जनतेला द्यावे असे आवाहन राहुल मोटे यांनी सावंत यांना दिले खडेश्र्वरवाडी धरणाची दुरुस्ती ५ वर्ष का रखडली ?
गिनीज बुकमध्ये नोंद झाली नसताना आरोग्याची वारीची नोंद ग्रीनीज बुक मध्ये झाल्याचे सावंत हे जनतेला खोटं सांगत आहेत त्यामुळे १२ लाख वारकऱ्यांची तपासणी न करता तपासणी दाखवून मोठा घोटाळा केल्याचा आरोप यावेळी राहुल मोटे यांनी केला . यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अँड. हनुमंत वाघमोडे,संदीप पाटील, नुरोद्दीन चौधरी, जयकुमार जैन, राहुल बनसोडे रमेश परदेशी, धनंजय मोरे सुभाषराव वेताळ, बाशाभाई शहाबर्फीवाले, श्रीहरी नाईकवाडी, नसीर शहाबर्फीवाले,नंदू शिंदे, खयूम तुटके, कोलते पाटील आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिती होते.
,
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.